मध्य प्रदेश, महाराष्ट्रानंतर आता पंजाबमधील शेतक-यांचेही कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आंदोलन
नवी दिल्ली, दि. 09 - मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र राज्यातील शेतक-यांनंतर आता पंजाब राज्यातील शेतकरीदेखील कर्जमाफीच्या मुद्द्यावर एकत्र येणार असल्याची चिन्हे दिसत आहे. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. 12 जूनपासून पंजाबमधील शेतकरीही कर्जमाफीसाठी आंदोलन करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्याचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यास शेतक-यांचे कर्ज माफ करणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही शेतक-यांचे कर्जमाफ करण्यात आले नाही. शेतक-यांची दिशाभूल करण्यात आल्याची टीका भारतीय शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बलबीर सिंग राजेवाल यांनी केली.