Breaking News

प्रशिक्षक निवडताना विराटला विश्‍वासात घ्या : संजय मांजरेकर

नवी दिल्ली, दि. 30 - भारतीय संघासाठी मुख्य प्रशिक्षकाची निवड करत असताना त्या प्रक्रियेमध्ये कर्णधार विराट कोहलीला विश्‍वासात घ्या, असा सल्ला माजी  क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी दिला आहे.
कुंबळे आणि कोहली यांच्यात झालेले वाद पाहता आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नवीन प्रशिक्षक निवडताना त्या प्रक्रियेदरम्यान कर्णधार विराट कोहलीलाही  विश्‍वासात घ्यावे. आधी झालेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर त्याला या प्रक्रियेची माहिती देणेच अधिक इष्ट ठरेल आणि त्यामुळे भविष्यात ड्रेसिंग रूममधील वातावरण  तणावाचे होणार नाही, असे मत मांजरेकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केले.
एक चांगला प्रशिक्षक संघातील खेळाडूंना प्रशिक्षण देताना स्वत: आनंदी असतो आणि खेळाडूंनाही आनंदी ठेवतो. तो त्याकडे काम म्हणून पाहत नाही, तर आवड  म्हणून पाहतो, असे ट्विट करत अशा प्रकारचा प्रशिक्षक मंडळाने निवडण्याचा अप्रत्यक्षणे सल्ला माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने दिला.