Breaking News

मुख्य प्रशिक्षकपदासाठी व्यंकटेश प्रसाद याचा अर्ज दाखल

नवी दिल्ली, दि. 30 - भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी माजी गोलंदाज व्यंकटेश प्रसाद याने आज अर्ज दाखल केला आहे. प्रसाद सध्या युवा क्रिकेट  संघाचा मुख्य निवडकर्ता म्हणून काम पाहत असून त्याचा 3 वर्षांचा कार्यकाळ सप्टेंबरमध्ये संपणार आहे. प्रसादने 33 कसोटी आणि 162 एकदिवसीय सामन्यांमध्ये  भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच, भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षकपदही प्रसादने भूषवले आहे. 27 जूनला रवी शास्त्रींनी या पदासाठी अर्ज दाखल केला आहे.  त्या आधी लालचंद राजपूत, डोडा गणेश, रिचर्ड पायबस, टॉम मूडी आणि वीरेंद्र सेहवाग यांनीही या पदासाठी अर्ज दाखल केले आहेत. या पदासाठी अर्ज दाखल  करण्याची मुदत 9 जुलैपर्यंत आहे.