दिल्ली पोलिसांकडून राज्यासह देशभरात अतिदक्षतेचा इशारा
नवी दिल्ली, दि. 21 - दिल्ली पोलिसांकडून राज्यात सुरक्षेच्या कारणास्तव आज अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला. यासोबतच देशभरातील सर्व राज्यांनाही हा इशारा देण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या गुप्तचर विभागाकडून दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दिल्लीतील गर्दीच्या भागांत हा हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर विभागाने वर्तवण्यात येत आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने देशभरातील सर्व सुरक्षा यंत्रणांना अतिदक्षतेच्या सूचना दिल्या आहेत. बस स्थानके, रेल्वे स्थानके, पंचतारांकित हॉटेल, मॉल, बाजार व सर्व धार्मिक स्थळांवर सुरक्षा वाढवण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय दूतावास, विमानतळ, मेट्रो स्थानके, क्रीडांगण व पर्यटन स्थळांचाही यात समावेश आहे. दिल्लीत विविध मार्गांवरून प्रवेश करणा-या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.