रामनाथ कोविंद यांनी दिला बिहारच्या राज्यपाल पदाचा राजीनामा
पाटणा, दि. 21 - भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी आज बिहारच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला. कोविंद यांचा राजीनामा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वीकारला. कोविंद यांनी राजीनामा दिल्यानंतर पश्चिम बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे बिहारच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे.
23 जून रोजी सकाळी 11 वाजता कोविंद राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू, पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांच्यासह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री, भाजप संसदीय मंडळाचे सदस्य आणि केंद्रीय मंत्र्यांची उपस्थिती असणार आहे.