Breaking News

विंडिज दौर्‍यासाठी ‘बीसीसीआय’कडून संघ व्यवस्थापकाची नियुक्ती


नवी दिल्ली,दि.11 : भारताच्या आगामी विंडिज दौर्‍यासाठी मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे मिलिंद कनमाडीकर यांची संघ व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अधिका-यांनी ही नियुक्ती केली. मात्र या नियुक्तीबाबत प्रशासकीय समितीने प्रश्‍न उपस्थित केले आहेत.
 मंडळासह सर्व राज्य क्रिकेट संघटनांमध्ये लोढा समितीच्या शिफारशी लागू होईपर्यंत मंडळाच्या अधिका-यांना नियुक्ती किंवा इतर निर्णय हे प्रशासकीय समितीच्या परवानगीने घेणे बंधनकारक आहे. असे असताना विंडिज दौ-यासाठी संघ व्यवस्थापकाची नियुक्ती अधिका-यांनी परस्पर कशी केली, असा सवाल उपस्थित करत प्रशासकीय समितीने ही नियुक्ती तूर्तास रद्द केली आहे. या संदर्भात सोमवारी होणा-या बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.