Breaking News

जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीत विरोधी संचालकांचे ठिय्या आंदोलन



अहमदनगर,दि.11 : जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीची 2016-17 या आर्थिक वर्षाची सर्वसाधारण सभा 9 जुलै रोजी होणार आहे.या पार्श्‍वभुमीवर सभासद हिताच्या विविध मागण्यांसाठी विरोधी संचालक आप्पासाहेब शिंदे,बाळासाहेब राजळे,बाबासाहेब बोडखे,चांगदेव खेमनर व सभासद सुनिल दानवे,पोपटराव साठे,कैलास राहाणे,भाऊसाहेब दुधाडे, बाळासाहेब कोकरे,शरद कराड,रामनाथ वर्पे,अरुण गुंजाळ आदिंनी संस्थेच्या मुख्य कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
वाढत्या महागाईचा विचार करुन सभासदांच्या आर्थिक गरजा पूर्ण होण्यासाठी जामीन कर्जाची मर्यादा 10 लाख रूपये करावी. 2016-17 मध्ये जागा व इमारत खरेदी,बांधकाम,संगणक,स्टेशनरी,फर्निचर खरेदी,इमारत रंगरंगोटी व दुरुस्ती तसेच इतर किरकोळ बाबींवर कोट्यावधी रुपये वारेमाप पध्दतीने खर्च झाल्याने अनावश्यक तरतुदी करु नये.अनावश्यक खर्च व तरतुदी टाळून सभासदांना 15 टक्के लाभांश द्यावा.सभासदांच्या कायम ठेवीवरील व्याजदरात वाढ करावी.जिल्हा उपनिबंधक यांनी
यापुर्वी रद्द केलेल्या रोजंदारी नोकर भरती वरील कर्मचार्यांना तात्काळ कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे.या सभासद हिताच्या विविध मागण्यांचा विचार न केल्यास सभासदांसह तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.