महाराष्ट्र बंदला सर्वच स्तरातुन उत्फुर्त प्रतिसाद
। पाच तास पत्रकारांचा तालुका पोलीस ठाण्यात ठिय्या
अहमदनगर, दि. 06 - गेल्या पाच दिवसांपासून शेतकर्यांचा संप सुरु असून सोमवारी संपाचा पाचवा दिवस असल्याने शेतकर्यांनी बंदचे आवाहन करण्यात आले होते. या संपाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले. शेतकर्यांनी पुकारलेल्या ‘बंद‘ला सर्वत्र प्रतिसाद मिळाला. तसेच नगर - जामखेड रोडवरील टाकळी येथे शेतकर्यांच्या आंदोलनाचे वृन्तांकन व फोटो काढणार्या दै.लोकमतच्या पत्रकार अन्सार शेख(चिचांंडी पाटील) यास कोणतेही कारण नसताना आंदोलन स्थळी बंदोबस्तासाठी आलेले कोतवालीचे पोलीस निरिक्षक परमान व इतर 7 ते 8 कर्मचार्यांनी दमदाटी करुन बेदम मारहाण केली. या प्रकरणी गुन्हा दखल करावा या मागणीसाठी शहरातील पत्रकारांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात तब्बल पास तास ठिय्या आंदोलन केले.आंदोलनस्थळी आलेले अप्पर पोलीस अधिक्षक पाटील ,उपअधिक्षक भोईटे यांनी फि र्याद घेण्यास टाळाटाळ केली. पत्रकार आक्रमक झाल्याने पोलीस अधिखक रंजनकुमार शर्मा, तालुका पोलीस ठाण्यात आले. त्यांनी घटनेचा अहवाल तयार करण्यासाठी सहाय्यक पोलीस अधिक्षक डॉ.अक्षय शिंदे यांची नेमणूक करुन, अहवालनंतर येत्या तीन दिवसानंतर संबंधितावर गुन्हा दाखल केला जाईल असे लेखी आश्वासन दिले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी एलसीबीचे पवार, तालुक्याचे परदेशी उपस्थित होते.
जिल्हयातील अनेक भागात गेल्या चार दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. अनेकांन यानंतर पोलिसांनी अटक केली असुन उद्याच्या संपाकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे.