अभियांत्रिकी शिक्षण व सुधारणा या विषयावर व्यापक चर्चासत्राचे आयोजन
औरंगाबाद, दि. 06 - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे ‘अभियांत्रिकी शिक्षण व सुधारणा’ या विषयावर येत्या बुधवारी व्यापक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कुलगुरु डॉ.बी.ए.चोपडे यांनी दिली.
मराठवाडयातील उद्योगपती अधिकारी, अधिष्ठता यांची महत्वाची बैठक होऊन हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीमध्ये ‘मराठवाडयातील अभियांत्रिकी शिक्षण सुधारणा व उपाय योजना‘ यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीमध्ये अभियांत्रिकी विद्याशाखेची उच्च शिक्षणातील गुणवत्ता चांगल्या प्रकारे सुधारण्यासाठी सर्व अभियांत्रिकी महाविद्यालय प्राचार्य व प्राध्यापक यांचे इंडस्ट्रीज सहाय्याने
या विषयावर बुधवारी (दि.सात) सकाळी 10 वाजता विद्यापीठाच्या नाटयगृहामध्ये ‘विद्यापीठ व उद्योग समीटचे आयोजन‘ करण्यात आले आहे. या समीटमध्ये ‘सीमआयए‘चे अध्यक्ष गुरप्रितसिंग बग्गा, उपाध्यक्ष प्रसाद कोकीळ, सचिव दुष्यंत पाटील, माजी अध्यक्ष राम भोगले, सुनील रायठ्ठा, मिलिंद कंक, मुनीष शर्मा, सुरेश तोडकर व प्रशांत देशपांडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या समिटमध्ये उद्योगातील तज्ञ, अभियांत्रिकी महाविद्यालयाचा संलग्नीकरण समितीमध्ये समावेश करुन घेणे, प्रत्येक तीन महिन्याला या समिटच्या माध्यमातून अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक यांच्याशी उच्च शिक्षणातील गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. याचबरोबर उद्योग क्षेत्रात लागणारे आवश्यक मनुष्य बळ अभियांत्रिकी महाविद्यालयातून उपलब्ध व्हावे यास्तव उद्योग क्षेत्रातील उद्योगपतींची मते या समिटमध्ये मांडण्यात येणार आहेत. याचबरोबर इंडस्ट्रीज तज्ञ, पालक व विद्यार्थी यांच्याशी संवाद साधण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेस प्रभारी अधिकारी डॉ.सतिश पाटील, कुलसचिव डॉ.प्रदीब जब्दे, प्र.अधिष्ठाता डॉ.वाल्मिक सरवदे, डॉ.दिलीप खैरनार यांची उपस्थिती होती. अभियांत्रिकी शिक्षणामध्ये आवश्यक ते बदल घडून यावेत हा या समिट मागील प्रमुख उद्देश्य आहे. यासाठी मराठवाडयातील सलंग्नित सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्य, प्राध्यापक व उद्योग क्षेत्रातील उद्योजकांनी या चर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन कुलगुरु डॉ.बी.ए.चोपडे यांनी केले आहे.