अल्पवयीन मुलीचे अपहरण; तक्रार दाखल
जळगाव , दि. 06 - राष्ट्रीय महामार्गावर अग्रवाल रुग्णालयाच्या परिसरात रस्त्यावर वास्तव्य करणा-या पाथरकर कुटुंबाच्या सात वर्षीय मुलीला टेम्पो चालकाने मध्यरात्री झोपेत असताना अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या मुलीला जाग आल्यानंतर आपण एका वाहनात असल्याचे लक्षात येताच तिने जोरदार किंचाळ्या मारायला सुरुवात केली. या किंचाळ्यांमुळे पकडल्या जाण्याच्या भीतीने टेम्पो चालकाने एरंडोल जवळ तिला रस्त्यावर सोडून पलायन केले.
कंडारी, ता.भुसावळ येथील मुळ रहिवाशी असलेले भिका फकीरा जाधव यांचा दगडापासून पाटे, वराटे बनविण्याचा व विक्रीचा व्यवसाय आहे. 30 मे रोजी भिका जाधव हे पत्नी विमल, मुलगी आरती व अन्य नातेवाईकांसह जळगावात आले. महामार्गावरील अग्रवाल चौकाजवळील रस्त्याला लागून असलेल्या मोकळ्या जागेत त्यांनी बस्तान मांडले होते. दिवसभर काम करुन रात्री त्याच जागेवर हे कुटुंब झोपते. शनिवारी नेहमीप्रमाणे रात्री दहा वाजता हे कुटुंब झोपून गेले होते.आरती हिची आई विमलबाई या रात्री 2 वाजता झोपेतून उठल्या असता मुलगी जागेवर नव्हती. शोधाशोध केल्यानंतरही मुलीचा शोध न लागल्याने त्यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.