मिशन इंद्रधनूषचा तिसरा टप्पा 7 जून रोजी
औरंगाबाद, दि. 06 - येत्या 7 जून ते 17 जूनपर्यंत माता व बालकांसाठी मिशन इंद्रधनूष राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीच्या बैठकीत देण्यात आली. अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी विश्ंवभर गावंडे हे होते.
सदर मोहिम या जिल्हयातील जोखीम ग्रस्त भागात घेण्यात येणार आहे. शुन्य ते 2 वयोगटातील बालकांना तसेच गरोदर मातांना वेळापत्रकाप्रमाणे देय असणा-या सर्व लसींची मात्रा मिळालेली नाही अशा सर्व असंरक्षित बालकांचे व गरोदर मातांचे लसीकरण करण्यात येत आहे. 5 वर्षाच्या आतील बालकांना आवश्यकतेनुसार लसीकरण करण्यात येणार आहे. हे लसीकरण घटसर्प, गोवर, धर्नुवात उद्रेक झालेला परिसर तसेच अतिदुर्गम भाग, शहरातील झोपडपट्टी, विटभट्टया, बांधकामे, स्थलांतरित वस्त्या, ऊस तोडणी वस्त्या यामध्ये घेण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.
7 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान 2652 बालकांचे तर 295 मातांचे तसेच 8 ते 16 मे यादरम्यान 2940 बालकांना व 308 मातांचे लसीकरण करण्यात आले. ही सर्व मोहीम जिल्हा परिषदेच्या एएनएम, आशा, एमपीडब्ल्यु, आरोग्य सहाय्यक अशा जवळपास अडीच हचार आरोग्य कर्मचा-यांमार्फत राबविण्यात येणार आहे. याशिवाय औरंगाबाद मनपा यंत्रणा देखील लसीकरणाचे कार्य करणार आहे.
बैठकीस जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. डी.पी. घोलप, डब्ल्युएचओ चे डॉ. प्रकाश, आयएमएचे डॉ. प्रदीप बेंजरगे, डॉ. सूहास जगताप, डॉ. विवेक कांबळे, डॉ. घोडके, डॉ. बकाल, जिल्हयातील सर्व आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र देठे आदींची उपस्थिती होती.