राज्य बॅडमिंटन स्पर्धेत यशला दुहेरीत विजेतेपद
अहमदनगर, दि. 10 - परभणी येथे दिनांक 4ते 8 जून पर्यंत सैंपन्न झालेल्या राज्य स्तरीय बैडमिंटन स्पर्धेत नगरच्या यश शाह याने हर्षल जाधव (सातारा ) या खेळाडूच्या बरोबर खेळून दुहेरी गटाचे वयोगट 17 चे विजेतेपद पटकाविले करंडक, -- रोख रु. - ,7001/- व प्रमाणप त्र असे बक्षिसाचे स्वरूप होते. यश व. हर्षल यांनी सेमी फायनल मध्ये नैशनल विजेते वरून कपूर व.सिद्धांषु गोरे या खेळाडूंचा सरळ सेट मध्ये पराभव करून अंतिम सामन्यात वेदांत काळे व शंतनू पवार यांचा पराभव करून विजेतेपद पटकाविले यश हा नगर येथील पेमराज सारडा महाविद्यालयात 12 कॉमर्स शाखेत शिकत असून पुणे च्या 17 वर्ष वयोगटातील संघात त्याचा समावेश आहे पुणे येथे प्रशिक्षक चैतन्य नाईक, व हेमंत हर्डीकर यांचे यश ला मार्गदर्शन मिळत आहे या अगोदर यश ने नवी मुंबई येथे एकेरीचे विजेतेपद मिळवले आहे त्याच्या या यशळ बद्धल त्याचे हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा .शिरीष मोडक ब्रिजलालजी सारडा, प्राचार्य .डॉ.अमरजा रेखी ,सुनीलरामदासी , बॅडमिंटन असो . चे उपाध्यक्ष युवा उद्योजक नरेंद्र फिरोदिया,सचिव मिलिंद कुलकर्णी , क्रीडा अधिकारी उदय जोशी अविनाश कुलकर्णी प्रो. धनंजय धोपावकर .प्रो संजय साठे . वाडिया पार्क बॅडमिंटन ग्रुप चे सर्व सदस्य यांनी यशाच्या या यश बद्धल अभिनंदन केले आहे.
