Breaking News

सामाजिक कार्यात जीवनाचा खरा आनंद व समाधान - हंद्राळे

अहमदनगर, दि. 10 - सामाजिक कार्यात जीवनाचा खरा आनंद व समाधान आहे. रतन तुपविहीरे यांनी शासकीय नोकरी सांभाळत सामाजिक कार्यात नेहमीच  अग्रेसर राहिले. फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार त्यांनी आपल्या सामाजिक कार्यातून कृतीत उतरविले. आयुष्याच्या वळणावर मागे वळून पाहताना केलेल्या कार्याचे  समाधान तर त्यांना मिळणार असून, यापुढेही सामाजिक कार्य चालू ठेवण्याची अपेक्षा कार्यकारी अभियंता वसंतराव हंद्राळे यांनी व्यक्त केली.
जलसंपदा मध्यम प्रकल्प विभागाचे वरिष्ठ लिपीक रतन तुपविहीरे यांच्या सेवापुर्ती निमित्त हॉटेल पंचवटी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हंद्राळे बोलत  होते. सेवापुर्ती निमित्त तुपविहीरे यांचा रोप देवून सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी कृषी विभागाचे सहसंचालक शिरीष जाधव, कार्यकारी अभियंता वसंतराव  हंद्राळे, सहा. अधिक्षक अभियंता जालिंदर पाचरुपे, प्रा.दिलीप गायकवाड, उपकार्यकारी अभियंता सुभाष तरटे, सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे, भिमराव खेडकर,  दिलीप शिरसाठ, रविंद्र पटेकर, महेंद्र राजगुरु, रावसाहेब निकाळजे, अलका सरवदे, अशोक भोंग, इंजी. राजेंद्र चाबुकस्वार, सुनिल सोयगावकर, प्रमोद खडामकर,  वसंतराव मगर, प्रा.जाधव, पटेकर आदिंसह जलसंपदा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. निस्वार्थ भावनेने तुपविहीरे यांनी कार्य केल्याचे शिरीष जाधव यांनी सांगून,  त्यांच्या संघटन कौशल्याचे कौतुक केले. सत्काराला उत्तर देताना तुपविहीरे म्हणाले की, विभागातील सहकारी व अधिकार्यांच्या सहकार्याने हा यशस्वी प्रवास पुर्ण  करता आला आहे. सेवानिवृत्ती जरी झाली असली तरी सामाजिक कार्य अधिक जोमाने यापुढील काळात चालू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तुपविहीरे यांनी  जलसंपदा विभागात 37 वर्षे सेवा केली असून, त्यांनी औरंगाबाद, ठाणे, अहमदनगर येथे काम पाहिले आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.विलास साठे यांनी केले.