Breaking News

बँकांनी आपली भूमिका संवेदनशीलतेने बजवावी - जिल्हाधिकारी निंबाळकर

जळगाव, दि. 21 - शासनाच्या लोककल्याणकारी योजना राबवितांना बँकांची महत्त्वाची आणि जबाबदारीची भूमिका असते बँकांनी आपली ही भूमिका संवेदनशीलतेने  बजवावी असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. किशोर राजे निंबाळकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय अग्रणी बँक समन्वय  समितीच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरुन मार्गदर्शन करतांना केले. 
श्री. निंबाळकर पुढे सर्वसामान्य जनतेला बँक आपली आहे अशी भावाना निर्माण होईल अशी वर्तणूक बँकेतील अधिकारी कर्मचार्‍यांनी ठेवली पाहिजे. आलेले कर्ज  प्रकरणांवर त्वरीत विचार करुन आठ दिवसांत आपला निर्णय अर्जदारास कळविला पाहिजे. मुद्रा कर्ज प्रकरणात विलंब होत असल्याचे त्यांनी निदर्शनात आणून दिले.  मुद्रा कर्ज प्रकरणातील परत फेडची माहिती अग्रणी बँकेस त्वरीत देण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
या बैठकीत पंतप्रधान आवास योजना, पीक कर्ज वाटप इष्टांक व साध्य केलेल्या इष्टांक, वार्षिक पत पुरवठा आरखडा, सुलभ पीक कर्ज अभियान बाबतबँक मेळावे,  आर्थिक साक्षरता शिबीर, पोस्टर प्रदर्शित करणे, स्टॅण्ड अप इंडिया आदि बाबीवर चर्चा झाली. शेतकर्‍यांना बँकानी पीक कर्ज वेळेवर उपलब्ध करुन द्यावे व आपली  सामाजिक बांधीलक व राष्ट्रीय कार्यातील योगदान करावे असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.
या बैठकीत जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर, भारतीय रिझर्व्ह बँकेचे श्री. चिले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक श्री. विक्रांत बगाडे यांनी सहभाग  घेतला व आपले विचार मांडले.
प्रारंभी जिल्हा अग्रणी बँक तथा सेंट्रल बँकेचे महाव्यवस्थापक श्री. दामले यांनी प्रास्ताविक बैठकीतील विषय मांडले. मागील बैठकीचे इतिवृत्त सादर करुन मंजूर करुन  घेतले. यावेळी त्यांनी सर्व बँकांनी शासनास सादर करावयाची माहिती त्वरीत पाठविण्याच्या सूचना दिल्या. तसेच बैठकांना वेळेवर व अद्यावत माहितीसह उपस्थित  राहण्याचे आवाहन केले. गटस्तरीय बैठकांना बँकांनी उपस्थित राहणे आवश्यक असून त्या माहिती आधारे जिल्हास्तरीय समिती माहिती एकत्रित करुन शासनास  सादर केली जाते. बैठकीस समितीचे सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.