Breaking News

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला शिवसेनेची मदत

बुलडाणा, दि. 30 - स्थानिक विश्रामगृह येथे शिवसंपर्क अभियानादरम्यान पक्ष निरीक्षक सुरेंद्र बागलकर यांनी आत्महत्याग्रस्त कुटुबाची भेट घेऊन त्यांना मुंबईवरून मदत पाठवली. यावेळी धनादेशचे वाटप शिवसेना तालुका प्रमुख कपिल खेडेकर, रोहित खेडेकर, शिवाजी देशमुख, नंदू कर्‍हाडे,  श्रीराम झोरे, सिंधुसिंग राजपूत, उपतालुका प्रमुख रामकृष्ण अंभोरे, शहर प्रमुख गणेश धुंदळे, यश चोपडा, नाजिम मोहम्मद, विकी जेउघाले उपस्थित होते. यावेळी एकलारा येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुबांच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च पालकत्व 1ली ते 10वी पर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी शिवसेना-युवासेनेने स्वीकारली आहे.