Breaking News

हिरकणी महिला अर्बनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

बुलडाणा, दि. 30 - परीक्षेत यशासाठी करावी लागणारी मेहनत अभ्यासातील सातत्य आणी यश मिळवायचेच या उत्तुंग धैयाने प्रेरीत झालेले विद्यार्थांनी आपल्या आई वडीलांचे अपेक्षेवर खरे उतरून माध्यमीक शाळा परीक्षेत जे घवघवीत यश मिळविले त्याची दखल घेत त्यांचे पाठीवर कौतुकाची थाप देवून त्यांना पुढील आयुष्यासाठी उभारावी मिळावी म्हणून हिरकणी महिला अर्बंन पतसंस्थेच्या वतीने त्यांचे सत्काराचा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. परीक्षेत उत्तीर्ण होणार्‍या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून समाजातील इतर विद्यार्थ्यांनाही त्यापासून प्रेरणा मिळावी व त्यांनीही चांगल्या मार्काने यश मिळविण्यासाठी थडपड करावी या भावनेने शहरातील सर्वच शाळेतील गुणवंताचा सत्कार संस्थेतर्फे केला जातो. असे उद्गार हिरकणी महिला अर्बन पतसंस्थेच्या अध्यक्षा अ‍ॅड.सौ. वृषालीताई बोंद्रे यांनी संस्थेतर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थींंच्या सत्कार प्रसंगी बोलतांना काढले. या कार्यक्रमात चिखलीचे आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी आवर्जुन उपस्थिती नोंदविली. 
हिरकणी महिला अर्बन पतसंस्थेच्या वतीने दरवर्षी चिखली शहरातून विविध परीक्षेत यश मिळविणारे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमाणपत्र व भेट वस्तु देवून केला जातो. यावर्षीही संस्थेच्या वतीने 125 गुणवंताचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे संचालक, सचिव सौ. किर्ती सिसोदीया, वंदना इंगळे, गिता भोजवानी, नेहा खरात, अनिता घुगे, विद्या देशमाने, कौसर फातेमा खान, मनिषा भुते, चवरे ताई, प्रमिलाताई जाधव, स्नेहा सावजी, त्रिविणे हाके, शानु श्रीवासत्व, प्रदिप हाके, डॉ. इर्शाद खान, आत्माराम देशमाने, प्रभु इंगळे, सर्जेराव भुते, हेमंद सिसोदिया, दिपक खरात, कन्हैया भोजवानी, शालीकराम चवरे, विजय वाघमारे, राकेश सावजी, विलास श्रीवास्तव, डॉ. संजय घुगे, मराठे सर, वळसे सर, परीहार सर, यांची उपस्थिती होती.
चिखलीतील कु. दिपाली राजु सुसर हिने 99.04 मार्क 10 वीच्या परीक्षेत मिळविल्याबध्दल तिचा विशेष सत्कार करण्याबरोबरच शैक्षणीक खर्चासाठी हिरकणी पतसंस्थेत पिग्मी एजंटचे काम करून  उदरनिर्वाह करणार्‍या व 10 वी च्या परीक्षेत 84 टक्के मार्क मिळविणार्‍या राहुल नारायण गवारे याचाही विशेष सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभात अनुराधा इग्लीश मेडीअमचे पल्लवी विष्णु परीहार, साक्षी चोपडा, ॠषीकेश मैद, मोहन अजंनकर, तक्षशिला हायस्कुलचे कोमल वेदपाठक, शुभम सुभाष सरादे, गिता गणेश डुकरे, राहुल गवारे, आदर्श हायस्कुल, शिवाजी हायस्कु, जिल्हा परिषद हायस्कुल, जाकीर हुसेन उर्दु स्कुल, राधाबाई खेडेकर विद्यालय, एस.पी.एम.कॉलेज, शिवाजी सिनेअर कॉलेज, व अनुराधा तंत्रनिकेतन मधील गुणवंताचाही सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास संस्थेचे व्यवस्थापक विशाल साखळकर, महेश जाधव, योगेश राजगुरे, सर्व कर्मचारी यांनी परीश्रम घेतले. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ. मनिषा भुते, आभार प्रर्दशन श्रीमती प्रमिलाताई जाधव यांनी केले.  मनुष्य आजन्म काही ना काही शिकत असतो, परीणामी शिक्षण ही अंखड चालणारी प्रक्रीया ठरते, शिक्षणाला वय नाही, केवळ शिक्षणाचा थ्यास आणी आवड मनात असली पाहीजे, हे आजवर थोरा मोठयांकडून ऐकाला, वाचायला मिळाले. आपल्या चिखलीतही शिक्षणा प्रती आसक्ती असलेले म्हणुनच वयाचे 57 वर्ष पुर्ण झाल्यानंतरही शिक्षण थांबवायचे नाही, असा निर्धार करून भगवान काळे यांनी 57 व्या वर्षी का होईना परंतु 10 वी ची परिक्षा न लाजता व वयाची पर्वा न करता दिली, आणी त्यातही यश मिळवीले ही बाब शिक्षण घेणारे नविन पिढीसाठी नक्कीच प्रेरणा देणारी ठरावी, म्हणूनच त्यांचा सत्कार करण्याचा योग हिरकणी महिला अर्बन पतसंस्थेमुळे आला ही आपल्यासाठी नक्कीच अभिमानाची बाब म्हणावी लागेल असे उद्गार आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी या सत्कार निमित्त बोलतांना काढले.