काश्मीरमधील अनंतनागमध्ये सीआरपीएफच्या छावणीवर दगडफेक
नवी दिल्ली, दि. 27 - काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील जंगलातमंडी येथे दगड हल्लेखोरांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या छावणीवर दगडफेक केल्याची घटना घडली. यात दोन जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांसह जम्मू काश्मीर पोलिसांवरही दगडफेक केली. दगडफेकीत स्थानिक पोलिसांचे 4 जवान आणि 1 नागरिक जखमी झाला आहे. याचदरम्यान दगड हल्लेखोरांनी दहशतवादी मुसाच्या समर्थनास घोषणाबाजी केल्या.
गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाचे जवान दहशतवाद्यांविरोधात कारवाई करत आहे. या कारवाईत सुरक्षा दलाने काही दहशतवाद्यांना ठारही केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाचे जवान दहशतवाद्यांविरोधात कारवाई करत आहे. या कारवाईत सुरक्षा दलाने काही दहशतवाद्यांना ठारही केले आहे.