Breaking News

चेन्नईमध्ये गेल्या 140 वर्षातील सर्वात मोठे पाणी संकट?

चेन्नई, दि. 27 - तामिळनाडूची राजधानी असलेल्या चेन्नई पुढे पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट उभे आहे . चेन्नईमध्ये गेल्या 140 वर्षातील सर्वात जास्त चिंताजनक परिस्थिती असल्याचे सांगितले जात आहे. चेन्नईमधील चारही तलाव कोरडे पडले असून त्यामुळे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे अडचणीचे झाले आहे.
चेन्नई शहरास 83 कोटी लिटर इतक्या पाण्याची रोज आवश्यकता असते. मात्र पाणी पुरवठा अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून गरजेच्या निम्माच पाणी पुरवठा होत आहे.
शहरातील पाणी पुरवठा करणारे पूंदी, रेड हिल्स, चोलावरम व चेबंरबंक्कम हे तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे चेन्नईमध्ये दररोज पाणी पुरवठा करणे शक्य होत नाही. काही भागांमध्ये तीन दिवसांतून एकदा पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे पाणी पुरवठा विभागाकडून 300 पाण्याचे टँकर पाठवण्यात येत आहेत.