कोकणात समुद्राच्या लाटांनी किनार्याला तडाखा
रत्नागिरी, दि. 27 - समुद्राला आलेलं उधाण आणि भरतीच्या लाटांमुळे कोकण किनारपट्टी परिसरात मोठं नुकसान झालं आहे. भरतीच्या लाटांच्या तडाख्याने कोकणच्या अनेक किनार्यावरील बागायती जमिनी समुद्राने आपल्या पोटात घेतल्या आहेत. लाटांच्या तडाख्यामुळे जमिनीची मोठी धूप झाली असून समुद्रकिनारी वाळूच्या उभ्या भिंती निर्माण झाल्या आहेत.
रत्नागिरी -गुहागरच्या वेळणेश्वर किनार्यावरील संरक्षक भिंतींना तडाखा बसला असून मोठं नुकसान झाले आहे. तर किनारपट्टीत अनेक माडाची मोठी झाडे समुद्राने गिळंकृत केली आहेत. वाहून गेलेली काही झाडं आज किनार्यावर दिसून येत आहेत. समुद्राचं पाणी किनारपट्टीत खूप आत शिरल्याने अनेक बागा धोकादायक स्थितीत आल्या आहेत. गुहागरच्या वेळणेश्वर आणि पट्याबरोबरच रत्नागिरीच्या मिर्या,मांडावी तर सिंधुदुर्गच्या देवबाग किनार्यांना या लाटांचा मोठा तडाखा बसला आहे.