कराडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांवर बलात्काराचा गुन्हा
सातारा, दि. 06 - महिलेशी ओळख वाढवून व लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार करणा-या कराड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकावर बलात्काराचा गुन्हा कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने कराडच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. हा गुन्हा शुन्य नंबरने कराड शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत महिला ही शासकीय सेवेत असून काही वर्षांपूर्वी कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक अशोक बाबुराव पाटील याच्याशी या महिलेची ओळख झाली. या महिलेच्या कौटुंबिक अडचणीमध्ये मदत करण्याच्या अनुषंगाने पाटील याने या महिलेची जाणीवपूर्वक ओळख वाढविली. तसेच लग्न करण्याचे आमिष दाखवून कोयनानगर, गोवा, शिरोळ, चिपळूण, वेणेश्वर आदी ठिकाणी नेऊन तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. मात्र नंतर महिलेने लग्नाचा तगादा लावला असता पाटील तिला टाळू लागला. संबंधित महिलेला फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांची थेट भेट घेऊन त्यांना आपली आपबीती कथन केली.
पाटील यांच्या आदेशानुसार कोरेगाव पोलीस ठाण्यात बाजार समितीचा संचालक पाटील याच्याविरोधात बलात्कार तसेच आर्थिक फसवणुक व जातीवाचक शिवीगाळ, मारहाण व जीवे मारण्याची धमकी अशा वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व गुन्ह्यांचे स्वतंत्र तपास करण्याच्या स्पष्ट सुचना पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिल्या आहेत.
गुन्ह्याचे कार्यक्षेत्र कराड शहर असल्याने शुन्य नंबरने हा गुन्हा कराड शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास कोरेगाव उपविभागाच्या उपाधिक्षक प्रेरणा कट्टे - पाटील यांच्याकडे देण्यात आल्याचे रात्री उशीरा आलेल्या वृत्तानुसार समजते.