दिव्यातील मासेविक्रेत्यांवर अन्याय होवू देणार नाही - महापौर मिनाक्षी शिंदे
ठाणे, दि. 06 - दिवा स्टेशन रोड येथे मासेविक्री करणा-या विक्रेत्यांवर मच्छीमार्केटसाठी जागा देण्याबाबत प्रशासनाशी चर्चा करुन त्यावर कायमस्वरुपी मार्ग काढण्यात येईल,दिव्यातील भूमिपुत्र मासेविक्रीचा पारंपारिक व्यवसाय करीत आहे,त्यांच्यावर अन्याय होवू देणार नाही असे आश्वासन महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांनी आज दिव्यातील मासेविक्री करणा-या भूमिपुत्राना दिले. यावेळी उपमहापौर रमाकांत मढवी, विभागप्रमुख उमेश भगत,शाखाप्रमुख सचिन पाटील, नगरसेवक अमर पाटील, नगरसेविका दिपाली भगत उपस्थित होते.
दिवा रेल्वे स्टेशन रोड येथे मासेविक्रीचा व्यवसाय करणा-या मासेविक्रेत्यांना रेल्वे स्टेशन परिसरात मासे विक्री करण्यास रेल्वे प्रशासनाने मनाई केल्याने या मासेविक्रत्यांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवा येथे असलेल्या महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर मासे विक्री करण्यासाठी मार्केट बांधून देण्यात यावे असे निवेदन येथील मासेविक्रेत्यांनी आज महापौर मिनाक्षी शिंदे यांना दिले. त्यावेळी दिव्यातील मासेविक्रेत्यांबाबत प्रशासनाशी चर्चा करुन त्यावर उपाययोजना केली जाईल असे महापौर यांनी नमूद केले.
दिवा रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या 25वर्षापासून दिव्यातील भूमिपुत्र मासेविक्रीचा व्यवसाय करीत आहे. सदर ठिकाणच्या जागेचे विजेचे बील तसेच मासे विक्रीचा परवाना त्यांच्याजवळ असून सुध्दा रेल्वेप्रशासन त्यांना मासेविक्रीस बंदी करत आहे. या ठिकाणी मासेविक्री करणा-या विक्रेत्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून दिवा येथे महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर सुसज्ज असे मच्छीमार्केट बांधून द्यावे अशी मागणी दिव्यातील भूमिपुत्र मासेविक्रत्यांनी महापौर यांचेकडे केली आहे.