Breaking News

रुळाखालील खडी वाहून गेल्याने मानखुर्द-सीएसटी मार्गावरील वाहतूक ठप्प

नवी मुंबई, दि. 28 - हार्बर रेल्वे मार्गावरील मानखुर्द-सीएसटी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. रेल्वे रुळाखालील खडी वाहून गेल्याने ही वाहतूक ठप्प झाली असून  प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरु असून पश्‍चिम रेल्वेची वाहतूक 5 ते 10 मिनिटे उशिराने सुरू आहे.  तर आज दुपारी 3 वाजून 23 मिनिटांनी मोठी भरती येणार आहे. दरम्यान, मुंबईसह राज्यात बुधवारीदेखील पावसाचा जोर कायम आहे. येत्या 24 तासांमध्ये  मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.