Breaking News

वालधुनी नदीत बुडून सात वर्षीय बालकाचा मृत्यू

ठाणे, दि. 28 - ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथील एका सात वर्षीय मुलाचा वालधुनी नदीत बुडून मृत्यू झाला. मृत मुलाचे नाव गणेश जैसवार असे असून तो  वडोलगावातील रहिवासी होता. काल संध्याकाळी गणेश नदी बुडाला अग्नीशमन दलाने अथक प्रयत्न करुन आज सकाळी त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. या  प्रकरणी स्थानिक नागरिकांनी महानगर पालिकेला दोषी ठरविले असून मनपाने नदीलगतच्या परिसरातील कचरा साफ केलेला नाही तसेच नदीजवळ संरक्षण  भिंतीदेखील बांधल्या नसल्याची तक्रार केली आहे.