Breaking News

व्हेनेझुएलामधील सर्वोच्च न्यायालयावर हल्ला

काराकास, दि. 28 - व्हेनेझुएलामधील सर्वोच्च न्यायालयावर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून हल्ला करण्यात आला. हा हल्ला दहशतवादी हल्ला असल्याचे राष्ट्राध्यक्ष निकोला  मादुरो यांनी म्हटले आहे. काराकासमधील शासकीय भागामध्ये हेलिकॉप्टर घिरट्या घालतांना दिसत होते. त्यानंतर अचानक स्फोटाचा मोठा आवाज आला. हे  हेलिकॉप्टर लष्कर अधिकारी ऑक्सर पेरेज चालवत असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हेनेझुएलामध्ये राष्ट्राध्यक्षांविरुद्ध गेले अनेक दिवस निदर्शने करण्यात येत आहेत .  आतापर्यंत या आंदोलनामध्ये 70 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.