वासराची हत्या केल्याप्रकरणी युथ काँग्रेसच्या अध्यक्षासह आठ जणांना अटक
तिरुवनंतपुरम, दि. 02 - वासराची हत्या केल्याप्रकरणी युथ काँग्रेसचा अध्यक्ष राजील मक्कुट्टीसह 8 कार्यकर्त्यांना केरळ पोलिसांनी अटक केली. कत्तलखान्यात होणा-या गोमांसाच्या विक्रीवर बंद घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध म्हणून युथ काँग्रेसच्या नेत्यांनी वासराची हत्या केली होती.
भारतीय जनता पक्षाच्या युवामोर्चाने याबाबतची तक्रार दाखल केली होती. या नेत्यानी वासराची रस्त्यात एका खुल्या ट्रकमध्ये हत्या केली व नंतर त्याचे मांस कन्नुरमधील नागरिकांमध्ये मोफत वाटले असे युवामोर्चाने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गानीही या घटनेचा निषेध केला आहे. हे कृत्य अविचारी व अस्विकार्ह असल्याचे त्यांनी म्हटले. काँग्रेस पक्षाची विचारधारा अशा प्रकारचा हिंसाचाराचे समर्थन करत नाही. केरळमधील घटना निंदनीय आहे. असे कृत्य करणा-यांना काँग्रेस पक्षात स्थान नसल्याचे पक्षाच्या संचार विभागाचे प्रमुख रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले.