Breaking News

मुस्लिम विरोधी घटनांच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्त्या शबनम हाशमी यांची पुरस्कार वापसी

नवी दिल्ली, दि. 28 - देशातील मुस्लिम विरोधी घटनांचा निषेध करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या शबनम हाशमी यांनी आपला राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाकडून  मिळालेला पुरस्कार परत केला आहे. ’अनहद’ या त्यांच्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत 2008 मध्ये त्यांना तत्कालिन काँग्रेस  सरकारकडून हा पुरस्कार देण्यात आला होता. तो आज त्यांनी अल्पसंख्याक आयोगाच्या कार्यालयात जाऊन परत केला.
यावेळी त्या म्हणाल्या की, देशात धार्मिक हेवेदावे वाढले आहेत. मुस्लिमांवर क्रुर हल्ले होत आहेत. केवळ मुस्लिमच नाही तर दलितांवरही हल्ले होत आहेत. या  सा-याने व्यथित होऊन पुरस्कार परत करत आहे. या सा-या घटना घडत असताना अल्पसंख्याक आयोगाकडूनही परिस्थितीत सुधारणा व्हाव्यात म्हणून काहीच  प्रयत्न होताना दिसत नाही. त्यामुळे अशा प्रकारे मी माझा विरोध नोंदवत आहे, असे त्या म्हणाल्या.