Breaking News

पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा निरूपयोगी; काँग्रेसची टीका

नवी दिल्ली, दि. 28 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौ-यातून काहीच हाती आले नाही. हा दौरा निरूपयोगी ठरला, अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली  आहे.
पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालेल्या चर्चेत एच 1 बी व्हिसा मुद्द्यावर चर्चा झाली नाही. भारतीयांच्या दृष्टीने हा महत्वाचा मुद्दा होता. मात्र,  नेमकी याच मुद्द्यावर चर्चा झाली नाही. त्यामुळे दौ-यातून काहीच हाती आले नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी व्यक्त केली. एका भारतीय  खासगी विमान कंपनीचे फक्त ट्रम्प यांनी कौतुक केले आहे. कारण यामुळे अमेरिकेत रोजगार निर्माण होणार आहे, असेही तिवारी म्हणाले.