Breaking News

तरुणाचे अपहरण; चौघांविरोधात गुन्हा दाखल

अकोले, दि. 10 - पैशाच्या व्यवहारावरून 21 वर्षीय तरुणाला मारहाण करून अपहरण करून नेल्याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल  केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक हेमंत भंगाळे यांनी दिली. 
या प्रकरणी सिद्धेश शिंदे रा जुन्नर व इतर तीन अशया चार जणांवर नारायणगाव पोलीस ठाण्यात भा. द. वि. क. 363/34 प्रमाणे गौतम सोजिनाथ उघडे वय 21  रा. मूळ रा कवठे यमाई ता शिरूर सध्या रा विघ्नहर सोसायटी नारायणगाव,  ता. जुन्नर याचे अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची  फिर्याद गणेश सोजिनाथ उघडे यांनी दिली आहे.
या बाबत भंगाळे यांनी दिलेल्या माहिती नुसार 2 जून 2017 ला रात्री 11.30 वा सुमारास नारायणगाव येथील विघ्नहर सोसायटी मधील गौतम उघडे याला जुन्नर  येथील सिद्धेश शिंदे व त्याचे तीन साथीदार यांनी स्कॉप्रिओ व स्कोडा (एम एच 14 बी जी 8282) या गाडीमध्ये येऊन गौतम याला मारहाण करून गाडीत टाकले व  अज्ञात ठिकाणी पळवून नेले आहे. हा प्रकार पैशाच्या व्यवहारावरून झाला असल्याची प्राथामिक माहिती पोलिसांना मिळाली असून स्थानिक रहिवाशी यांनी दिलेल्या  माहिती नुसार 2 जून ला सोसायटी मध्ये 3 चारचाकी वाहने आली होती.
दोन वाहनांचे वर्णन मिळाले असून अंधार असल्याने तिसरे वाहन कोणते होते हे समजले नाही. त्यामुळे  या 4 जणांवितरिक्त अजून काही  साथीदार या प्रकरणात  सहभागी असल्याचे निष्पन्न होण्याची शक्यता असल्याची माहिती भंगाळे यांनी दिली आहे. सध्या स्कोडा गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. कोणालाही अद्याप  अटक करण्यात आले नाही.
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक हेमंत भंगाळे, शंकर भवारी हे करीत आहेत.