Breaking News

शासनाच्या दुटप्पी धोरणाचा शेतकर्‍यांना फटका : खा.राजु शेट्टी

अकोले, दि. 10 - सरकारने शेतकर्‍यांना कर्जमागणीचे दिलेले आश्वासन पूर्ण केले नसल्यामुळेच शेतकर्‍यांच्या भावनांचा उद्रेक होऊन त्याची परीणीती संपात झाली  आहे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी शासनाने लागू केल्या असत्या तर शेतकर्‍यांवर आंदोलन करण्याची वेळ आली नसती शासनाच्या या दुटप्पी धोरणाचा फटका  शेतकर्‍यांना बसला  असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजु शेट्टी यांनी व्यक्त केले 
पिंपरीपेंढार येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेप्रसंगी ते बोलत होते याबाबत बोलताना ते पुढे म्हणाले की मुख्यमंत्री म्हणतात आम्ही शेतकर्‍यांबरोबर चर्चा करू  ज्यांनी शेतकर्‍याच्या पोटी जन्म घेतलाय त्यांनीच शेतकर्‍यांबरोबर चर्चा करायची आम्ही जर असे म्हटलो तर काय होईल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे  सरकार एकीकडे आंदोलनाच्या काळात तीनशेहून अधिक बाजार समित्या सुरु होत्या असल्याचे सांगते तर दुसरीकडे या आंदोलनादरम्यान दोनशे अठ्याहत्तर कोटी  रूपयांचे नुकसान झाल्याचे सांगते सरकारचा हा दुटप्पीपणा शेतकर्‍यांच्या लक्षात आला
आहे शेतीमालाचा भाव सरकार पाडत असल्याचा गंभीर आरोप करत शासनाने शेतकर्‍यांनी केलेले आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला आहे शेतकर्‍यांवर  आंदोलनादरम्यान गुन्हे दाखल झाले असून माझ्यावरही बत्तीस गुन्हे दाखल आहेत त्यामुळे शेतकर्‍यांनी घाबरून न जाता आपल्या न्याय हक्कासाठी लढा चालू ठेवला  पाहिजे गेल्या साठ ते सत्तर वर्षात फक्त तीनवेळाच कर्जमाफी झाली असल्याचे सांगून सरकार अंबानी आणि अदानींना सवलती देतात विजय मल्ल्या कर्ज बुडवून तिकडे  क्रिकेट चे सामने पहात मजा मारतोय आणि आमचा शेतकरी मर मर मरतोय त्याच सरकारला काहीच वाटत नाही कर्जमाफी हा आमचा हक्क आहे आणि आम्ही तोच  मागत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी सतिष काकडे, आशाताई बुचके, माऊली खंडागळे,  प्रकाश बालवडकर, रोहीदास वेठेकर, रोहीदास कुटे, शेतकरी  संघटनेचे अध्यक्ष संजय भुजबळ राजेंद्र ढोमसे  बापूसाहेब कारंडे रमेश कोल्हे अजित वाघ आंबादास हांडे कैलास लेंडे कुलदिप काकडे नवनाथ वाघ उपस्थित होते.