Breaking News

लिब्रेशन ग्रुप ऑफ महाराष्ट्र करतोय अनाथ विद्यार्थ्यांना मदत!

बुलडाणा, दि. 30 - लिब्रेशन ग्रुप ऑफ महाराष्ट्र हे ऑर्गनायझेशन राज्यभरात दरवर्षी अनाथ, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील मुला-मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी काम करत आहे. त्याचप्रमाणे यंदाही राज्यातील इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या व पुढील शिक्षण घेऊ न शकणार्‍या अनाथ मुलांसाठी आर्थिक मदत ऑर्गनायझेशनच्या वतीने करण्यात येत असून अशा विद्यार्थ्यांनी व संबंधित पालकांनी ऑर्गनायझेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष विकास नांदवे यांनी नुकतेच बुलडाणा येथे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाप्रसंगी आयोजित कार्यक्रमात केले आहे.