Breaking News

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने गुणवंतांचा सत्कार

बुलडाणा, दि. 30 -  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा जळगाव जामोद यांचे वतीने तालुक्यातील 10 वी व 12 वी तील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेबराव भगत हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून रामकृष्ण रजाने जेष्ठ नेते भारीप,  अरुणभाऊ पारवे तालुकाध्यक्ष भारिप, पार्वताबाई इंगळे महीला आघाडी, भाऊराव गव्हांदे, सुनिलभाऊ बोदडे, रमेश नाईक, रतन नाईक, सुपडा बांगर संचालक कृउबास., भास्कर भगत, झनके सर, जितेंद्र गवई, भारसाकळे, आकाश निकडे, वानखडे,  वंदना भगत, आनंद शेगोकार,  तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन रमेश डोंगरे जेष्ठ आंबेडकरी साहित्यिक हे लाभले होते. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष गवई यांनी केले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शुभेच्छा देवुन भावी शैक्षणिक आयुष्यातील मार्गक्रमण व शैक्षणीक संधी या संदर्भात मान्यवरानी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप व बुध्द आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सुनिलभाऊ बोदडे तर आभार विनोद शेगोकार यांनी मानले.  कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वर्षी संस्थेचे गुणगौरव करण्याचे हे सातवे वर्ष होते.