पंम्पिंग स्टेशन रोड येथे महानगर शेतकरी आठवडे बाजाराला प्रारंभ
। शेतकरी व ग्राहकांमध्ये होणार थेट व्यवहार
अहमदनगर, दि. 06 - मध्यस्थी दलाल हटवून, शेतकरी व ग्राहकांमध्ये थेट व्यवहार होण्यासाठी पिपल्स हेल्पलाईनच्या पुढाकाराने हसरा ग्राहक, हसरा शेतकरी मोहिमेतंर्गत सावेडी, पंम्पिंग स्टेशन रोड येथे रविवारी महानगर शेतकरी आठवडे बाजार भरविण्यात आला. या आठवडे बाजारचे उद्घाटन हनुमंत भुतकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अॅड.कारभारी गवळी, प्रकाश थोरात, अर्जुनराव गांगर्डे, अॅड.अमीत गवळी, नचीकेत गवळी, अरुण धोंडकर, साईमन देठे, शाहीर कान्हू सुंबे, राजेंद्र भवार, सुर्यभान थोरवे, दिलीप गुगळे, कमलाबाई शिंदे, नथुराम कुमावत, श्रीराम कुमावत, संजय कुलकर्णी, लक्ष्मण शिरसाठ, ओम कदम, साईनाथ कवट, नामदेव बोरुडे, सुदाम देवखिळे आदिंसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.पहिल्याच दिवशी बाजारला नागरिकांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. नागरिकांनी थेट शेतकर्यांकडून फळे व भाज्यांची खरेदी केली. दर रविवारी आठवडे बाजार भरविण्यासाठी पिपल्स हेल्पलाईनने पुढाकार घेतला असून, शेतकर्यांनी थेट आपला माल पंम्पिंग स्टेशन रोड येथे आनून विकण्याचे आवाहन करण्यात आले आहे.अॅड.कारभारी गवळी म्हणाले की, शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यास सरकार असमर्थ ठरत असताना, आश्वासनाचे गाजर शेतकर्यांना देण्यात आले आहे. शेती मालाला चांगला हमी भाव नसल्याने व मध्यस्थी दलाला मार्फत होणारी लुटीने शेतकर्यांना उत्पादन खर्च निघणे देखील अवघड झाले आहे. चांगला पाऊस होवून उत्पादन जास्त झाल्यास शेत मालाचे भाव कोसळतात तर अवकाळी पाऊस, दुष्काळासारख्या नैसर्गिक संकटांना तोंड देत शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. शेतकर्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंन्त पोहचून दलालमुक्त व्यवहार होण्यासाठी पिपल्स हेल्पलाईनने पुढाकार घेतला आहे. यामुळे शेतकर्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.