Breaking News

‘बालभारत 2017’च्या शिबीरात रंगले मुले

अहमदनगर, दि. 06 - मोबाईल व कॉम्प्युटरच्या युगामुळे घरात बसून मुलांमध्ये एकलकोंडेपणा येवू शकतो, त्यासाठी मुलांमध्ये जावून सांघिक खेळ, कला, नृत्य, संगीत यामुळे त्यांच्यात एकोप्याची भावना वाढीस लागते. हीच गोष्ट लक्षात घेऊन महापौर सुरेखा कदम यांनी मुलांसाठी  ‘बालभारत 2017’चे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात तज्ञ मार्गदर्शक बासरीवादन, रांगोळी, आर्ट अ‍ॅण्ड क्राफ्ट, चित्रकला, योग, प्राणायम, गीतगायन, कथावाचन, भाषण, निबंधलेखन, हस्ताक्षर, नृत्य, वाद्य आदि विषयांचे  प्राथमिक ज्ञान मुलांना देत आहेत. यासाठी डॉ.अमोल बागुल यांचे सहकार्य लाभत आहे.
यावेळी उपक्रमाबद्दल माहिती देतांना शिबीराचे संयोजक संभाजी कदम यांनी सांगितले की, सध्या उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने मुलांना शिस्तीत धमाल व मस्ती करण्यासाठी या बालभारत उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या मुलांमध्ये एकत्र येण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. मुले मोबाईल गेममध्येच गुंतून राहू लागले आहेत. त्यामुळे त्यांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी व त्यांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. उन्हाळा तीव्र असल्याने मुलांना बाहेर खेळता येत नाही. त्यामुळे सर्व मुलांना एकत्रित करुन त्यांना आपल्या आवडत्या विषयाचे ज्ञान मिळावे, या उद्देशाने या शिबीरचे आयोजन केले आहे.