Breaking News

येत्या चार वर्षात देशाची डिजीटल अर्थव्यवस्था चार हजार अब्ज डॉलरपर्यतचा टप्पा गाठणार

नवी दिल्ली, दि. 18 - देशाच्या डिजीटल अर्थव्यवस्थेत येत्या चार वर्षांत चार हजार अब्ज डॉलरपर्यतचा टप्पा गाठण्याची क्षमता असल्याची शक्यता काही तंत्रज्ञान  क्षेत्रातील कंपन्यांकडून वर्तविण्यात येत आहे. केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी डिजीटल अर्थव्यवस्थेशी संबंधीत काही कंपन्यांच्या प्रमुखांसह बैठक घेतली. या  बैठकीनंतर रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली.
सरकार नवीन इलेक्टॉनिक, सॉफ्टवेअर या क्षेत्रांसह आणि अन्य नव्या क्षेत्रांना प्रोत्साहन देणार असून या क्षेत्रांच्या माध्यमातून डिजीटल अर्थव्यवस्थेला चालना  मिळणार आहे. तसेच देशात दोन ते चार हजार अब्ज डॉलरचा टप्पा गाठण्याची क्षमता असल्याचे सांगण्यात आले आहे.
रविशंकर प्रसाद यांच्यासह या बैठकीत नास्कॉमचे अध्यक्ष आर. चंद्रेखर, गूगल इंडियाचे राजन आनंदन, विप्रो कंपनीचे रशीद प्रेमजी, इंडियन सेल्युलर असोशिएनचे  राष्ट्रीय अध्यक्ष पंकज मोहिंद्रू, इंटरनेट ण्ड मोबाइल एसोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष सुभोश राय आणि हाइक मेसेंजरचे मुख्य कार्यकारी अधिकारी केविन भारती  मित्तल यांचा सहभाग होता.