Breaking News

आठ लोटेबहाददरांवर पोलिस कार्यवाही

नांदेड, दि. 01 - हिमायतनगर,मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या गुडमॉर्निंग पथकाने बुधवार दि.31 मे रोजी दोन गावातील 8 लोटे  बहाद्दर नागरिकांवर पोलीस कार्यवाही करून पुन्हा उघड्यावर जाणार नाही याची शपथ दिली आहे. 
हिमायतनगर तालुक्याला स्वच्छ भारत अभियानातून हागणदारीमुक्त करण्यासाठी पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. यासाठी गावा -  गावात प्रत्यक्ष व जनजागृती फलकाच्या माध्यमातून स्वच्छतेचे महत्व पटवून दिले जात आहे. परिणामी बहुतांश गावात शौचालयांची कामे पूर्ण झाली तर काही ठिकाणी  प्रगतीपथावर आहेत. असे असताना देखील अनेकजण शौच्चालयाचा वापर न करता उघड्यावर शौचालयास जात असल्याचे दिसून येत आहे. यावर आळा  घालण्यासाठी गटविकास अधिकारी सुहास कोरेगाव यांनी गुडमॉर्निग पथक स्थापन केले असून, सकाळच्या प्रहरी गावात दाखल होऊन उघड्यावर शौच्चालयास  जाणार्यांना परावृत्त करण्यासाठी तसेच बाहेर शौच्चालयास गेल्यास 1200 रुपये दंड व शासनाकडून मिळणार्या सर्व सवलती बंद होतील, यासाठी घरोघरी शौच्चालय  बांधा, यासह विविध स्लोगनचे नारे गुडमॉर्निंग पथकाच्या मार्फत देऊन सांगितले जात आहे. या बाबतच्या सूचना देऊनही काहीजण उघड्यावर शौच्चालयास जात  असल्याचे समजताच बुधवारी दि.31 मे रोजी सकाळी पोलीस पथकासह गुडमॉर्निंग पथकाने पोलीस कार्यवाही करत पुन्हा उघड्यावर शौच्चालयास जाणारा नाही अशी  शपथ घेऊन सोडून देण्यात आले आहे. गुडमॉर्निक पथकाच्या आजच्या कार्यवाहीने उघड्यावर शौच्चालयास जाणार्यामध्ये खळबळ उडाली आहे.नागरिकांनी शौचालयाचा  वापर करावा - सुहास कोरेगाव, गटविकास अधिकारी हिमायतनगर तालुक्यातील 4 गावे 100 टक्के हागणदारीमुक्त झालेली आहेत.