काश्मीरात लष्कराचे ’ऑपरेशन ऑल आऊट’, 258 दहशतवाद्यांची यादी तयार
श्रीनगर, दि. 23 - काश्मीर खो-यातील दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी ’ऑपरेशन ऑल आऊट’ नावाची मोहीम हाती घेतली आहे . त्यासाठी लष्कराने 258 दहशतवाद्यांची यादी तयार केली आहे. खो-यातील 258 दहशतवाद्यांना पकडण्यासाठी लष्कराने वेगाने हालचाली करण्याची योजना आखली आहे. लष्कर ए तोयबा, हिज्बुल मुजाहिद्दीन आणि अल बद्र या दहशतवादी संघटनेशी संबंधित दहशतवाद्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. गुप्तचर यंत्रणेच्या सहकार्याने ही यादी तयार करण्यात आली आहे.