’दंगल’ची जगभरात 2000 कोटींची कमाई
मुंबई, दि. 27 - अभिनेता आमिर खानच्या ‘दंगल’चा जगभरात धुमाकूळ सुरु आहे. चीनमध्ये सोमवारी अडीच कोटींचा गल्ला जमवत ‘दंगल’ने 2 हजार कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. भारतासह जगभरात एवढा गल्ला जमवणारा ‘दंगल’ पहिलाच भारतीय सिनेमा ठरला आहे. ‘दंगल’ने फक्त कमाईचेच नव्हे, तर विक्रमांचेही आकडे मोडले आहेत. ‘दंगल’ इंग्लिश व्यतिरिक्त इतर भाषेतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट इतिहासातील पाचवा सिनेमा ठरला आहे. ‘दंगल’ हा 2017 या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा पहिलाच क्रीडा सिनेमा आहे. तर चीनमध्ये सर्वाधिक गल्ला जमवणारा पहिलाच नॉन-हॉलिवूड सिनेमा ठरला आहे.
एवढंच नव्हे तर ‘दंगल’ने जागतिक व्यासपीठावर भारतीय सिनेमाकडे पाहण्याची दृष्टी बदलली असल्याचंही परदेशातील वृत्तांमध्ये म्हटलं आहे. पैलवान महावीर फोगाट यांच्या जीवनावर आधारित या सिनेमात आमिर खानने प्रमुख भूमिका साकारली आहे. सिनेमाचं कथानक आणि महावीर फोगाट यांच्या संघर्षाचं जागतिक स्तरावर कौतुक केलं जात आहे. भारतातही या सिनेमाने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. सिनेमाचं दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केलं आहे. ‘दंगल’ने प्रदर्शनापासून बॉक्स ऑफिसवर तीनच दिवसात 100 कोटीचा गल्ला गोळा केला होता. कमी दिवसात हा टप्पा पार करणारा आमिरचा हा पाचवा सिनेमा असून 2014 मधील ‘पीके’, 2013 मधील ‘धूम-2’, 2009 मधील ‘थ्री इडियटस’ आणि 2008 मधील ‘गजनी’ने हा विक्रम रचला होता.