Breaking News

झिम्बाब्वेचा श्रीलंकेवर 6 गडी राखून धक्कादायक विजय

गॉल, दि. 01 - पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात आज झिम्बाब्वेने श्रीलंकेवर 6 गडी राखून धक्कादायक विजय मिळवला आणि मालिकेत  1-0ची आघडी घेतली. नाणेफेक जिंकून श्रीलंकेने प्रथम फलंदाजी केली. कुशल मेंडिस (86), उपुल थरंगा (नाबाद 79) आणि गुणतिलका (60) या तिघांच्या  अर्धशतकांमुळे आणि कर्णधार मॅथ्यूजच्या (43) तडाखेबाज खेळीमुळे श्रीलंकेने झिम्बाब्वेपुढे 5 गड्यांच्या मोबदल्यात 316 धावांचे आव्हान ठेवले. छताराने सर्वाधिक  2 बळी टिपले. 317 धावांचे आव्हान झिम्बाब्वेने केवळ 47.4 षटकात 4 गड्यांच्या मोबदल्यात पार केले. सलामीवीर सोलोमन मीअर (112) याने शतकी खेळी  केली. सीन विल्यम्सने (65) त्याला चांगली साथ दिली. तर सिकंदर रझा (67) आणि मॅल्कम वॉलर (40) यांनी नाबाद 102 धावांची भागीदारी करून संघाला  सामना जिंकून दिला. असेला गुणरत्नेने 2 बळी टिपले. शतकवीर सलोमन मीअर याला सामनावीर घोषित करण्यात आले.