पतंजलि आयुर्वेदची सहा उत्पादने नेपाळमधील गुणवत्ता चाचणीत नापास
काठमांडू, दि. 22 - पतंजलि आयुर्वेदची सहा उत्पादने नेपाळमधील वैद्यकीय गुणवत्ता चाचणीत नापास ठरली आहेत. त्यामुळे नेपाळ सरकारने तात्काळ त्यांचे उत्पादन थांबवण्याचे आदेश दिले आहेत. नेपाळच्या आरोग्य मंत्रालयाने पतंजलिला ही सहा उत्पादने पुन्हा भारतात नेण्याचे आदेश दिले आहेत. दुकानदारांनाही ही उत्पादने न विकण्याचे चे आदेश देण्यात आले आहेत . . सदोष आढळलेल्या उत्पादनांमध्ये दिव्या गाशर चूर्ण, बाहुची चूर्ण, आवळा चूर्ण, त्रिफळा चूर्ण, अदविया व अश्वगंधा चूर्ण यांचा समावेश आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सात उत्पादनांची चाचणी करण्यात आली होती. त्यातील केवळ एकाच उत्पादनाला नेपाळच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळेकडून हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यापूर्वी उत्तराखंडमधील वैद्यकीय चाचणीतही पतंजलिची उत्पादने नापास ठरली होती.