Breaking News

थकबाकीदार वीजग्राहकांविरोधात महावितरणची धडक मोहीम

पुणे, दि. 08 - वारंवार आवाहन करूनही वीजबिल न भरणार्‍या थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीत करण्याच्या धडक कारवाईला बारामती परिमंडलात सुरुवात  झाली आहे. घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे किती रक्कम थकलेली आहे, हे न पाहता नियमांच्या आधीन राहून वीजपुरवठा खंडीत करण्यात येत आहे.
बारामती परिमंडलात सद्यस्थितीत घरगुती, वाणिज्यिक तसेच औद्योगिक वर्गवारीतील 6 लाख 23 हजार 638 वीजग्राहकांकडे 66 कोटी 44 लाख रुपयांची थकबाकी  आहे. यात 5 लाख 65 हजार 136 घरगुती ग्राहकांकडे 46 कोटी 16 लाख, वाणिज्यिक 48 हजार 957 ग्राहकांकडे 13 कोटी 2 लाख तर 9 हजार 545 औद्योगिक  ग्राहकांकडे 7 कोटी 26 लाख रुपयांची थकबाकी आहे. दिलेल्या मुदतीत वीजबिलांचा भरणा न केल्याने थकबाकीचे प्रमाण वाढत असल्याने या थकबाकीदार ग्राहकांचा  वीजपुरवठा खंडीत करण्याची धडक कारवाई सुरू करण्यात आलेली आहे.