नऊ लाख रुपये किमतीचे धनादेश आरोग्य विभागातून गहाळ
औरंगाबाद, दि. 08 - तापडिया डायग्नोस्टिक सेंटरच्या हरवलेल्या फाइलचा छडा लागण्याची शक्यता निर्माण झालेली असताना याच सेंटरने पालिकेच्या नावे दिलेले नऊ लाखाचे धनादेश आरोग्य विभागातून गायब झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी आरोग्य वैद्यकीय अधिकार्यांनी आरोग्य अधिकारी व कर्मचा-यास कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
महापालिकेच्या बन्सीलालनगर येथील जागेत तापडिया डायग्नोस्टिक सेंटर चालवले जाते. जागेसंबंधीचा सेंटरचा करार संपल्यामुळे मुदतवाढीसाठी सेंटरतर्फे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाच्या आधारे तयार करण्यात आलेली फाइल आरोग्य विभागातून मे महिन्यात गायब झाली. सोळा कोटींची ही फाइल असल्याचे बोलले जात होते. अस्तित्वात असलेल्या मूळ फाइलच्या आधारे कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. याच दरम्यान तापडिया डायग्नोस्टिक सेंटरतर्फे महापालिकेच्या नावे देण्यात आलेले नऊ लाख रुपये किमतीचे धनादेश आरोग्य विभागातून गहाळ झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.
सेंटर तर्फे एप्रिल महिन्यात हे धनादेश देण्यात आले होते. प्राप्त झालेले धनादेश लेखा विभागात जमा न करता तसेच ठेवून देण्यात आले. आता ते गहाळ झाले. याप्रकरणी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी यांनी आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री पाडळकर यांच्याकडून खुलासा मागवला असून हेमंत साताळकर या कर्मचा-यास कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.