Breaking News

राज्यातील 439 ग्रामपंचायतींचा बिगुल वाजणार

सोलापूर, दि. 08 - ऑक्टोबर 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत मुदत संपणार्‍या राज्यातील हजार 439 ग्रामपंचायतींचा बिगुल वाजणार आहे. या  पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाने 10 जून ते ऑगस्ट या कालावधीत प्रभाग रचना अंतिम करण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. यामध्ये कोकण  विभागातील हजार, नाशिक 862, पुणे 1857, औरंगाबाद 2251, अमरावती 1264, नागपूर 1205 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने ऑक्टोबर  2017 ते फेब्रुवारी 2018 कालावधीत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींचा प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ऑक्टोबर महिन्यात 126, नोव्हेंबर 648, डिसेंबर  2984, जानेवारी 536 फेब्रुवारी महिन्यात 145 ग्रामपंचातींची मुदत संपणार आहे. जिल्हानिहाय ग्राम पंचायती : पालघर 102, ठाणे 66, रायगड 251, रत्नागिरी  236, सिंधुदुर्ग 345, नाशिक 193, धुळे 108, जळगाव 230, नंदुरबार 53, अहमदनगर 278, पुणे 311, सोलापूर 258, सातारा 337, सांगली 462, कोल्हापूर  489, औरंगाबाद 218, बीड 859, नांदेड 859, परभणी 178, उस्मानाबाद 126, जालना 285, लातूर 357, हिंगोली 62, अमरावती 273, अकोला 281,  यवतमाळ 101, वाशीम 288, बुलडाणा 321, नागपूर 246, वर्धा 118, चंद्रपूर 61, भंडारा 380, गोंदिया 358 आणि गडचिरोली जिल्ह्यातील 42 ग्रामपंचायतींचा  समावेश आहे. तहसीलदार यांनी गुगल मॅपवर प्रत्येक गावाचा नकाशा तयार करणे - 10 जून तलाठी, ग्रामसेवक यांनी प्रभाग पाडणे, सीमा आरक्षण निश्‍चित करणे -  14 जून तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली प्रारूप प्रभाग रचनेस मान्यता देणे - 20 जून ग्रामसभा बोलावून प्रारूप प्रभाग रचनेवर आरक्षणाची सोडत काढणे - 27  जून प्रारूप प्रभाग रचना आरक्षणाला तहसीलदार यांनी मान्यता देणे - 30 जून प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती सूचना मागवण्यासाठी प्रसिद्धी - जुलै हरकती सादर  करण्याचा अंतिम दिनांक - 11 जुलै प्राप्त हरकती, सूचना उपविभागीय अधिकार्‍याकडे सादर करणे - 15 जुलै प्राप्त हरकती, सूचनांवर सुनावणीनंतर अभिप्रायासह  अंतिम निर्णयासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करणे - 25 जुलै जिल्हाधिकारी यांनी प्रभाग रचना आरक्षणाला अंतिम मान्यता - 31 जुलै असे आहे.