Breaking News

नांदेडमध्ये सात लाख रुपयांची दारू जप्त

नांदेड, दि. 07 - नांदेड पोलिसांनी हदगाव तालुक्यातील तमश्यात आज पहाटे धाड टाकली असून सात लाखाची दारू जप्त केली आहे सदर माल हा शिवसेना  आमदाराच्या एका माजी जिल्हा परिषद सदस्यांची बंद पडलेल्या बार मधील असल्याचे समजते. 
पोलीस अधीक्षकांचे विशेष पथकाने दि. 5 रोजी माहूर येथे चार ठिकाणी कार्यवाही करून 13 लाखाहून अधिकच मुद्देमाल जप्त केला. येथील कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर  पेट्रोलिंग करत परत सरकारी जीपने नांदेडकडे येताना मिळालेल्या गुप्त माहितीवरून हदगाव तालुक्यातील तामश्यात बालाजी बापूराव चंदनवार यांच्या राहत्या घरी  छापा टाकला असता 2 लाख 97 हजार 600 रुपयाचा अवैद्य देशी दारूचा साठा जप्त केला. तसेच तामस - भोकर रडवरील आनंदराव घंटलवार यांच्या  मर्फहाऊसवर छापा टाकला, यावेळी येथे 03 लाख 91 हजार 340 रुपयांची देशी- विदेशी दारूचा साठा मिळवून आला. हा सर्व मुद्देमाल जप्त करून पोलीस  अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या पथकाने 6 लाख 88 हजार 940 रुपयाचा अवैद्य माल जप्तीची कार्यवाही करून तामसा पोलीस ठाण्यात मु.दा. का.कलम 65 (इ)  प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.