महाराष्ट्र बँकेवर आरबीआयचे निर्बंध
सातारा, दि. 21 - बँक ऑफ महाराष्ट्रच्या वाढत्या अनुत्पादित कर्जामुळे रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले असून या निर्बंधामुळे बँकेच्या दैंनदिन कामकाजावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे बँकेचे अंचल प्रबंधक हरिश्चंद्र माझीरे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
माझीरे म्हणाले, मार्च 2017 आर्थिक वर्षाच्या अखेरीस झालेल्या बुडीत कर्जाचे प्रमाण 11.76 टक्के पोहोचल्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने बॅँक ऑफ महाराष्ट्रावर तत्पर सुधारात्मक कृती घेतली आहे. बँकेच्या आर्थिक परिस्थितीमुळे सुधारणा होण्यासाठी तसेच कार्यक्षमता वाढवण्यासाठी या निर्बंध लावण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँकेतर्फे राष्ट्रीयकृत बँकांवर नियंत्रण ठेवण्याच्या प्रणालीचा हा एक भाग आहे. या तत्पर सुधारणात्मकता कृतीमुळे सर्वसाधारण ग्राहकांसाठी देण्यात येणार्या सर्व दैंनदिन सेवांना कोणतीही बाधा पोहचणार नाही. किंबहुना याचा बँकेच्या व्यावसायिक कौशल्य स्तर वाढण्यास मदत होणार आहे.