प्रत्येकाने सचिनसारखे जिद्दीने, कष्टाने आपले ध्येय साध्य केले पाहिजे - राहुल त्रिपाठी
पुणे, दि. 01 - सचिन हा उत्कृष्ठ खेळाडू आहे मात्र सर्वसामान्य खेळाडूपासून ते आंतराष्ट्रीय दर्जाचा उत्कृष्ठ खेळाडू बनण्याचा त्याचा प्रवास हा प्रेरणादायी आहे. आजची पिढी खूप स्वप्न पाहते मात्र कष्ट करण्याची जास्त तयरी नसते. प्रत्येकाने सचिन सारखे जिद्दीने व कष्टाने आपले ध्येय साध्य केले पाहिजे. असे मत आयपीएल पुणे संघातील क्रिकेटपटू राहुल त्रिपाठी याने बुधवारी व्यक्त केले.
श्रीनिवास एन्टरटेंनमेंटच्या वतीने शहरातील 19 वर्षाच्या खालील तब्बल 750 क्रिकेटपट्टूंना ‘सचिन - अ बिलियन ड्रीम्स’ हा चित्रपट मोफत दाखविण्यात आला. यावेळी मुलांचे प्रोत्साहन वाढविण्यासाठी राहुल त्रीपाठी यांनी हजेरी लावली होती. यावेळी तो बोलत होता. यावेळी राहूल ने मुलांसोबत चित्रपटाचा आनंद देखील लुटला.
राहुल त्रिपाठी म्हणाला, सचिन म्हणजे क्रिकेट प्रेमींसाठी देवच. मी सुद्धा लहानपणापासून सचीनचे अनुकरण करीत इथवर पोहचलो. आजची तरूणाई झटपट फेम मिळवण्यासाठी या खेळाकडे वळत असल्याचे जाणवते. मात्र हा खेळ परिश्रमाचा असून खेळाकडे दुर्लक्ष झाले तर आपली विकेट सहजरित्या पडण्याची शक्यता असते. त्यामुळे क्रीकेट खेळताना त्यातून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करावात. मला लहानपणापासून क्रीकेट ची आवड होती. मी मुळचा श्रीनगरचा आहे. वडील आर्मी मध्ये होते. डेक्कन जिमखान्यात मी क्रीकेटचे शिक्षण घेतले आहे. काळ पुढे गेला त्याप्रमाणे आवडीचे रूपांतर प्रोफेशन मध्ये झाले. आयपीएल साठी पुण्याच्या टिम मधून समाधानकारक खेळी खेळलो आहे असाच पद्धतीने पुढील आयुष्यात भारताचे व पुण्याचे नाव उज्वल करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे राहुलने सांगितले.