’वनराई’ला ’इको फ्रेंड्स पुरस्कार’ जाहीर
पुणे, दि. 01 - जागतिक पर्यावरण दिनाचे (5 जून) औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ पुणे इको फ्रेंड्स यांच्यातर्फे दिला जाणारा ’इको फ्रेंड्स (पर्यावरण मित्र) पुरस्कार-’ पर्यावरण संवर्धनासाठी काम करीत असलेल्या ’वनराई’ संस्थेला जाहीर झाला आहे. याचबरोबर वनीकरण आणि कृषी क्षेत्रात भरीव काम करणारे पर्यावरणतज्ज्ञ अभय भंडारी, गेली चौदा वर्षे सातत्याने रेनवाटर हार्वेस्टिंगमध्ये काम करणारे कर्नल शशिकांत दळवी यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
या पुरस्काराचे वितरण 4 जून रोजी सायंकाळी 6 वाजता पत्रकारभवन येथे होणार आहे. महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. याप्रसंगी लायन्स क्लबचे दीपक कुदळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ आणि रोपटे असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. याप्रसंगी अभय भंडारी यांचे ’पर्यावरणपूरक जीवनशैली’ या विषयावर व्याख्यानही होणार आहे.
दरम्यान, संस्थेच्या वतीने 5 ते 7 जून या कालावधीत पर्यावरणविषयक व्यंग्यचित्रांचे प्रदर्शन अण्णाभाऊ साठे सभागृहात आयोजीत केले आहे या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते 5 जून रोजी सायंकाळी 7 वाजता होणार आहे. चारुहास पंडित, वैजनाथ दुलंगे, घनश्याम देशमुख यांच्यासह राज्यभरातील व्यंग्यचित्रकारांनी रेखाटलेली व्यंग्यचित्रे या प्रदर्शनात लावण्यात येणार आहेत. अशी माहिती पुरस्कार सोहळ्याचे समन्वयक अनिल मंद्रुपकर ,लायन्स क्लब ऑफ पुणे इको फ्रेंड्सचे अध्यक्ष रमेश कुलकर्णी, मुकुंद शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.