प्रभाकर देशमुखयांचा शरद पवार यांच्या हस्ते रविवारी सत्कार
पुणे, दि. 01 - माण गौरव समितीच्या वतीने कोकण विभागीय आयुक्त आणि पुण्याचे माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. 5 जून रोजी सायंकाळी 5.30 वाजता बालगंधर्व रंगमंदिर, येथे या समारंभाचे आयोजन केले आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते देशमुख यांचा भारतीय प्रशासकीय सेवेबद्दल सत्कार करण्यात येणार आहे.
या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे-पालवे, पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार छत्रपती संभाजीराजे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार विजयसिंह मोहिते पाटील, खासदार अनिल शिरोळे, माजी मंत्री पतंगराव कदम, माजी दिलीप वळसे-पाटील, माजी हर्षवर्धन पाटील, आमदार जयकुमार गोरे, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती, आदर्श सरपंच पोपटराव पवार व ईतर लोकप्रतिनीधी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी प्रभाकर देशमुख यांच्या कार्याचा आढावा मुलाखतीच्या स्वरुपात घेणार आहेत. देशमुख यांच्याविषयी विविध मान्यवरांनी लिहिलेल्या भावना शब्दबद्ध करण्यात आलेल्या गौरवग्रंथाचे प्रकाशनही यावेळी करण्यात येणार आहे, अशी माहिती माण गौरव समितीच्या वतीने देण्यात आली आहे.