Breaking News

छावा,संभाजी बिग्रेडच्या पदाधिका-यांची जयाजी सुर्यवंशी यांच्या घरावर टोमॅटोफेक

औरंगाबाद, दि. 05 - मुख्यमंत्री यांच्यासोबतच्या बैठकीत सहभाग घेवून शेतक-यांच्या प्रश्‍नी चर्चा करणारे किसान क्रांतीचे समंवयक जयाजी सुर्यवंशी यांच्या  घरावर आज अखिल भारतीय छावा संघटना, संभाजी ब्रिगेड, मावळा संघटनेच्या पदाधिका-यांनी टोमॅटो फेकले तर जयाजी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.  पोलिस बंदोबस्त असल्याने कोणताही अनर्थ घडला नाही.
जयाजी सुर्यवंशी मुंबईहून निघून औरंगाबाद येथे येणार असल्याच्या माहितीच्या अधारे विविध मराठा संघटनेचे पदाधिकारी बीडबायपास रोड परीसरातील जयाजीच्या  घरी गेले यावेळी जयाजी हे घरी नसल्याने घरच्यांनी सांगितले. तर जयाजी यांच्या घराला पोलिस बंदोबस्तही होता. तेंव्हा या पदाधिका-यानी तेथे टोमॅटो, भेंडी, कांदे  फेकून निदर्शने केली. जयाजी यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आप्पासाहेब कुढेकर, संजय सावंत, रमेश गायकवाड, यांच्यासह मराठा संघटनेचे कार्यकर्ते  यावेळी उपस्थित होते. हा संप चालु ठेवून सरकारला कोंडीत पकडावे, अशी अपेक्षा या कार्यकर्त्यांची होती. ती फोल ठरल्याचा राग येवूनच ही टोमॅटोफेक झाली.