कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्या - संजीवराजे नाईक-निंबाळकर
सातारा, दि. 05 - जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेतकर्यांनी उत्पादकता वाढवावी. खते, बियाणे वेळेत मिळवण्यासाठी कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकारी, कर्मचार्यांनी वाई पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचार्यांशी समन्वय ठेवून तालुक्यातील शेतकर्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेतकर्यांनी उत्पादकता वाढवावी. खते, बियाणे वेळेत मिळवण्यासाठी कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकारी, कर्मचार्यांनी वाई पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचार्यांशी समन्वय ठेवून तालुक्यातील शेतकर्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.
वाई तालुका खरीप हंगाम आढावा बैठक नुकतीच वाई पंचायत समितीच्या किसनवीर सभागृहात झाली. यावेळी जिल्हा परिषदचे कृषी सभापती मनोज पवार, पंचायत समितीच्या सभापती रजनी भोसले, उपसभापती अनिल जगताप, सदस्य विक्रांत डोंगरे, सुनिल कांबळे, मधुकर भोसले, सौ.संगीता चव्हाण, दिपक ननावरे, ऋतुजा शिंदे, तहसिलदार अतुल म्हेत्रे, गटविकास अधिकारी अशोक भवारी, जिल्हा परिषद सदस्या संगीता मस्कर, रंजना उगळे, प्रकाश चव्हाण, शारदा ननावरे, तालुका कृषी अधिकारी रविंद्र कांबळे यांच्यासह विविध गावचे सरपंच, ग्रामसेवक, गाव कामगार, तलाठी, खते, बियाणे, विक्रेते शेतकरी आदी उपस्थित होते.
यावेळी संजीवराजे ना. निंबाळकर म्हणाले, वाई तालुक्यात हळद पिकाचे क्षेत्र मोठे आहे. पण आजपर्यंत हळद हे पीक जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या नियोजनात कधीच समाविष्ठ करण्यात आले नाही. पण पुढील वर्षापासून हळद हे पीक जिल्हा परिषदेच्या नियोजनात घेतले जाईल. त्याचबरोबर उपसभापती अनिल जगताप यांनी कृषी नियोजनात जिल्हा परिषदेकडून दिली जाणारी रक्कम ही अपुरी असल्याचे सांगितल्याने वाई पंचायत समितीसाठी 50 हजार रुपये अधिक रक्कम दिली जाईल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. कृषी सभापती मनोज पवार म्हणाले, यंदा पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याने शेतकर्यांना खरीप हंगामामध्ये पाण्याची सहसा अडचण येणार नाही. शासनाच्या नवीन धोरणानुसार ज्या शेतकर्यांना वाई पंचायत समितीमार्फत बियाणे आाणि खते हवी आहेत, अशा शेतकर्यांनी पंचायत समितीकडे अर्ज करावेत. गटविकास अधिकारी त्याला तात्काळ मंजूरी देतील. त्यासाठी शेतकर्यांना कसलेही हेलपाटे मारावे लागणार नाहीत. पण त्यासाठी आधार कार्ड सोबत असणे गरजेचे आहे. त्यामुळे सबसीडी देणे सुलभ होईल. यावेळी चांगदेव बागल यांनीही मार्गदर्शन केले.वाई तालुका कृषी अधिकारी रविंद्र कांबळे यांनी तालुक्याचा आढावा सादर केला. प्रास्ताविक गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी केले.