ऐतिहासिक अमृतांजन पाडण्याच्या हालचाली
पुणे, दि. 08 - पुणे व रायगड या दोन जिल्ह्यांना जोडणारा ऐतिहासिक अमृतांजन पाडण्याच्या हालचाली महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सुरू केल्या आहेत. याकरिता महामंडळाने थेट जनतेमधून सूचना व हरकती मागविल्या असून येत्या 24 जुलैपर्यंत त्याकरिता कालावधी दिला आहे. हा पुल मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतुकीचा वेग मंदावत असल्याने पाडण्याचा विचार सुरू आहे.
पुणे व रायगड जिल्ह्याला जोडणारा हा ऐतिहासिक पुल खंडाळा घाटात इंग्रज अधिकारी सर कॅप्टन ह्युजेस यांनी मेजर जनरल जॉन मालकोल्म जी.सी.ई. अॅनो डोमिनी यांच्या मार्गदर्शनाखाली 1830 साली बोरघाटात उभारण्यात आला होता. पश्चिम महाराष्ट्राचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेला हा प्राचीन पुल मुंबई पुणे द्रुतगती मार्गासाठी अडथळा ठरु लागला आहे. त्यामुळे हा पुल पाडून या ठिकाणची वळणे काढून रस्ता सरळ झाल्यास या परिसरात होणारी वाहतूक कोंडी व अपघात दोन्ही कमी होतील असे रस्ते विकास महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे. सदरचा पुल हा रेल्वेच्या ताब्यात असल्याने याबाबत रेल्वे प्रशासनाशी देखील पत्रव्यवहार करण्यात आला असून नागरिकांच्या याबाबत सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या सूचना व हरकतीनंतर याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
मुंबई - पुणे या दोन महत्वाच्या शहरांना जोडणारे अंतर कमी व्हावे व ही शहरे जलदगतीने जोडली जावीत याकरिता द्रुतगती मार्गाची निर्मिती करण्यात आली होती. मात्र खंडाळा बोरघाटातील खोपोली ते खंडाळा परिसरात द्रुतगती महामार्ग बनविताना आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे या परिसरात मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग व द्रुतगती मार्ग एकत्र आले. त्यातच घाट क्षेत्रातील चढण व उतारामुळे या परिसरात अपघात व वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. द्रुतगतीवर दुतर्फा असलेल्या मार्गीकांपैकी सर्वात शेवटची लाईन ही अवजड वाहनांसाठी मधली लेन ही हालक्या वाहनांसाठी व कॉरिडोरच्या लगतची लेन ही ओव्हर टेकिंगसाठी असा नियम आहे. मात्र, असे असताना अमृतांजन पुलाखालील अरुंद जागेमुळे या ठिकाणी नियमांला छेद देत शेवटची लेन हालक्या वाहनांसाठी व मधली लेन अवजड वाहनांसाठी असे फलक लावलेले असल्याने याठिकाणी लेन कटिंगची समस्या मोठी आहे. अमृतांजन पुलाच्या खाली रस्ता अरुंद असल्याने याठिकाणी मुंबईकडे जाणार्या अवजड वाहनांना उतारावर वळण घेता येत असल्याने वाहने उलटून अनेक अपघात झाले आहेत. हे अपघात रोखण्यासाठी सध्या रस्ते विकास महामंडळाने सदरचा पुल पाडण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.